बंद स्टेडियममध्ये IPL खेळण्यास तयार


MK Digital Line
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे अनेक क्षेत्रातील कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.

याचाच एक भाग म्हणजे दरवर्षी होणाऱ्या IPL क्रिकेट स्पर्धा यावर्षी लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र बंद स्टेडियममध्ये IPL खेळण्यास तयार असल्याचा पर्याय दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अजिंक्य रहाणेनं सुचवला आहे.

● अजिंक्य म्हणाला..:


आयुष्यात अनपेक्षित काहीही होऊ शकतं हे कोरोना व्हायरसनं आपल्याला शिकवलं. त्यामुळे आपण जे काय करतो त्यात समाधानी रहायला हवं आणि जे आहे त्यात आनंदी रहायला हवं. आयपीएल किंवा अन्य खेळांबद्दल विचारत असाल, तर ते प्रेक्षकांविना खेळवायला हरकत नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्याला प्रेक्षकांविना खेळण्याची सवय आहेच.

चाहत्यांशिवाय आमचं अस्तित्व नाही आणि त्यामुळेच त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यांना घरी बसून लाईव्ह क्रिकेट पाहायला मिळालं तरी ते आनंदी होतील. दरम्यान, 'प्रेक्षकांची सेफ्टी महत्त्वाची आहे आणि त्यासाठी रिकाम्या स्टेडियममध्ये खेळावे लागले, तरी आम्ही तयार आहोत', असंही अजिंक्य म्हणाला.

Post a Comment

Previous Post Next Post