Telegram मध्ये येतंय शानदार फीचर


MK Digital Line
सुरक्षित इस्टंट मेसेजिंग अ‍ॅप अशी टेलीग्रामची ओळख आहे. टेलीग्राममध्ये सध्या व्हिडिओ कॉलिंग फीचर नाहीये. पण, लवकरच यामध्येही तुम्हाला ग्रुप व्हिडिओ कॉलिंगचे फीचर मिळणार आहे. 

सिक्युरिटी आणि प्रायव्हसीसाठी ओळख असलेल्या टेलीग्रामने, सुरक्षित व्हिडिओ कॉलिंग फीचर आणणार आहोत, अशी घोषणा कंपनीने केली आहे. 

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने व्हिडिओ कॉलिंगची मागणी प्रचंड वाढलीये. Zoom बरंच लोकप्रिय झालंय, व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप कॉलिंगची मर्यादा वाढवलीये, फेसबुकने तब्बल 50 जणांना एकत्र व्हिडिओ कॉलिंगचं फीचर आणलं आहे.

Google duo मध्येही काही बदल झाले, आणि आता टेलीग्रामचाही या यादीत समावेश होणार आहे. जगभरात टेलीग्रामचे 40 कोटी युजर्स झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post