राज्यात २४ तासांत एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद
MK Digital Line
मुंबई : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र तरीही शुक्रवारी राज्यात आतापर्यंतच्या २४ तासांतील सर्वाधिक १ हजार ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
● मृतांची संख्या :
तर गेल्या २४ तासात २६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५०६ झाली आहे, तर मृतांचा आकडा ४८५ वर पोहोचला आहे.
● २६ जणांचा मृत्यू :
पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३, पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्गमधील १, भिवंडी महापालिकेतील १, ठाणे महापालिकेतील १, नांदेडमधील १, औरंगाबाद मनपामधील १ आणि परभणीतील एकाचा समावेश आहे.
दरम्यान काल १०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत १ हजार ८७९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाइन तर ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
Post a Comment