लॉकडाऊन मुळे अ‍ॅमेझॉनला 7500 कोटींचा तोटा

MK Digital Line
अ‍ॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीला कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

● कोटींचा फटका :

मार्चच्या तिमाहीत अ‍ॅमेझॉनचा नफा 29 टक्‍क्‍यांनी घटल्याने कंपनीला 102 कोटी डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार 7500 कोटींचा तोटा झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

मागील वर्षी अ‍ॅमेझॉनला मार्चच्या तिमाहीत 356 कोटी डॉलर्सचा नफा झाला होता. लॉकडाऊनमुळे यावेळी त्यांना तब्बल 102 कोटी डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला. लॉकडाऊन काळात सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे जीवनावश्‍यक वस्तू वगळता इतर वस्तूंची डिलिव्हरी करण्यास ई-कॉमर्स कंपन्यांना बंदी आहे. 

जीवनावश्‍यक वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी अ‍ॅमेझॉनला वस्तूंचे पॅकिंग, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, त्यांना संरक्षण साहित्य पुरवणे आणि अधिक पैसे देणे यासर्वांमध्ये वाढ करावी लागली. तसेच इतर वस्तूंच्या वितरणाला परवानगी नसल्याने कंपनीला आर्थिक तोटा झाल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post