इंस्टाग्रामचं नवं फिचर सादर!


MK Digital Line
फोटो शेअरिंग अ‍ॅप इंस्टाग्रामने नवीन अपडेट जारी केले असून यामुळे युजर्सची 'सायबर बुलिंग' सारख्या समस्येपासून सुटका होणार आहे. 

या फिचरनुसार आता इंस्टाग्राम युजर्स एकाचवेळी 25 कॉमेंट्स डिलीट करू शकतात. 

जर एकाचवेळी अनेक कॉमेंट्सद्वारे ट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे वाटल्यास या कॉमेंट्स एकदम डिलीट करता येतील. हे फीचर अँड्राईड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी जारी करण्यात आलेले आहे.

● नवीन अपडेटमध्ये अजून काय? : 

  • आता युजर्स ठरू शकतील की त्यांना कोण टॅग करू शकते व कोण नाही.
  • या फीचरमध्ये युजरला Everyone, Only People You Follow आणि No One असे तीन पर्याय मिळणार. यातील एक पर्याय निवडता येणार.
  • तसेच युजरला पिन कॉमेंटचा देखील पर्याय मिळेल. म्हणजेच युजरला एखादे कॉमेंट आवडले तर त्याला पिन टू टॉप करता येईल. 

Post a Comment

Previous Post Next Post