कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत चीनच्या पुढे
MK Digital Line
भारताने कोरोना रुग्णांच्या संख्येत चीनला मागे टाकलं आहे. भारतात आज कोरोना रुग्णांचा आकडा 85 हजार 784 च्या वर पोहोचला आहे. तर कोरोनाचा जिथे जम्न झाला, त्या चीनमध्ये सध्या 84 हजार 031 कोरोना रुग्ण आहेत. अमेरिकेच्या जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीच्या कोरोना विषाणू रिसोर्स सेंटरने ही माहिती दिली.
चीनमध्ये काल 82 हजार 929 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर भारतात काल 82,085 रुग्ण होते. मात्र, आता हा आकडा वाढून थेट 85 हजार 784 वर पोहोचला आहे. तर चीनमध्ये 84 हजार 031 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच भारतात चीनच्या तुलनेत 1 हजार 753 अधिक रुग्ण आहेत.
भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 649 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात गेल्या 24 तासात तब्बल 3 हजार 699 रुग्णांची भर पडली आहे. इतकंच नाही तर गेल्या 24 तासात 100 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवाय भारतात आतापर्यंत 27 हजार 900 जण कोरोनातून बरे झाले आहेत.
Post a Comment