मी देखील एक माणूसच, मलाही दडपण येते : धोनी
MK Digital Line
कॅप्टनकुल असलो तरी मी देखील एक माणूसच आहे. मलाही भीती वाटते, मलाही दडपण येते, अशा शब्दात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एम्फोर या सामाजिक संस्थेच्या या ऑनलाईन कार्यक्रमात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
● धोनी म्हणाला :
माझ्या बद्दल सांगायचे तर लॉकडाऊनमुळे मलाही घरीच राहावे लागत असल्याने कंटाळा आला आहे.
विनाकारण घराबाहेर पडून निष्काळजीपणा केला तर केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही संकटात टाकत आहोत हे लक्षात घेतले पाहिजे.
भारतीय क्रिकेटपटूंकडून सर्वाधिक अपेक्षा बाळगल्या जातात. त्यामुळे आपल्या लाडक्या खेळाडूकडून काही चूक होऊ शकते. हे आपल्या चाहत्यांना मान्यच नसते.
करोनामुळे स्पर्धा कधी सुरू होतील? हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे घरातच राहिल्याने खेळाडूंनाही मानसिक ताण, दडपण येते हे समजुन घेतले पाहिजे.
Post a Comment