Tik Tok चे रेटिंग सुधारलेच कसे?


MK Digital Line
गेल्या काही आठवड्यांपासून टिकटॉक आणि चर्चा सुरूच आहे. लाखो युजर्सनी टिकटॉकला प्ले स्टोरवरून 1 स्टार रेटिंग देत रेटिंग 4.5 स्टार वरून 1.2 स्टारवर आणले होते.

या दरम्यान टिकटॉकवर बंदीची मागणी देखील सुरु झाली होती. मात्र आता 21 मिलियन युजर्स रिव्ह्यूसह टिकटॉकची प्ले स्टोरवरील रँकिंग सुधारून 1.4 स्टार्स झाले आहे. 

● युजरचा दावा काय सांगतो? :

नोबर्ट इलेक्स या ट्विटर युजरने दावा केला आहे की, गुगलने लाखो टिकटॉक रिव्ह्यू हटवल्याने रेटिंग 1.2 स्टार्सवरून 1.4 स्टार्स झाले आहे.

त्याने दोन फोटो शेअर केले आहेत. यात एकामध्ये 28 मिलियन रिव्ह्यूसह रेटिंग 1.2 स्टार्स दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये 27 मिलियन रिव्ह्यूसह 1.6 स्टार्स रेटिंग दिसत आहे. 

सध्या प्ले स्टोरवर 21 मिलियन युजर्ससह टिकटॉकचे रेटिंग 1.4 स्टार्स आहे. म्हणजेच एका आठवड्यात गुगलने 7 मिलियन युजर्सचे रिव्ह्यू डिलीट केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post