घरून काम करणाऱ्यांना गुगल देणार भत्ता


MK Digital Line
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये याची विशेष काळजी घेत आहे.

घरातून काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला गुगल, भत्ता म्हणून एक हजार डॉलर्स (सुमारे 75 हजार रुपये) देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

● कंपनीने जारी केलेल्या निवेदनात काय म्हटले? :


  • 6 जुलै रोजी कंपनी वेगवेगळ्या शहरांमध्ये 10 टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालये उघडण्याची प्रक्रिया सुरू करेल.
  • जर सर्व काही व्यवस्थित झाले तर 30 टक्के कर्मचार्‍यांना सप्टेंबरपर्यंत कार्यालयात बोलावले जाईल.
  • या दरम्यान जे कर्मचारी घरून काम करतील त्यांना कंपनीकडून भत्ता स्वरूपात 1000 डॉलर्स दिले जातील.
  • घरातून काम करण्यासाठी लोकांना लॅपटॉप, फर्निचर व इतर उपकरणे लागतील, त्यासाठी हे पैसे देण्यात येणार आहेत.

गूगलचे CEO सुंदर पिचाई यांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे कि, कंपनी यावर्षी मर्यादित संख्येने ज्यांनी गरज आहे अशा कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात (रोटेशनवर) बोलावणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post