माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग AIIMS रुग्णालयात दाखल


MK Digital Line
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली मधील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल केले आहे. कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये मनमोहन सिंह यांना निरीक्षणासाठी ठेवले आहे. 

अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

पीटीआय या वृत्तसंस्थेने त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. नामवंत अर्थतज्ज्ञ असलेले 87 वर्षीय मनमोहन सिंग यांनी युपीए सरकारच्या काळात सलग दहा वर्षे पंतप्रधान पद भूषविले होते

मनमोहन सिंह यांना अनेक वर्षांपासून हृदयविकाराने ग्रासले आहे. तसेच सक्रिय राजकारणापासून ते दूर झाले होते. राज्यसभेचे खासदार असताना मात्र त्यांनी नियमितपणे संसदीय अधिवेशनात हजेरी लावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post