फेसबुकचे नवे कोलॅब अॅप लाँच
MK Digital Line
फेसबुकने शॉर्ट व्हिडीओ तयार करण्याची सुविधा असणारे 'कोलॅब' हे अॅप सादर केले आहे.
अद्याप ते फक्त आयओएस प्रणालीसाठी आणि ते देखील बीटा म्हणजे प्रयोगात्मक अवस्थेत सादर केले आहे. या संदर्भातील माहिती एका पोस्टच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे.
● 'कोलॅब' कसे आहे?
- या अॅपमध्ये कुणीही तीन युजर हे एकत्रीतपणे म्युझिक व्हिडीओ तयार करू शकतील.
- यात ओरीजनल व्हिडीओत संगीत मिक्स करता येणार आहे.
- यासोबत स्वतंत्र संगीत तयार करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे.
- हा व्हिडीओ फेसबुक स्टोरी, इन्स्टाग्राम आदींसह अन्य सोशल मंचावर सहजपणे शेअर करता येणार आहे.
- मात्र हे अॅप वापरण्यासाठी नेमके कसे लॉगीन करावे? याबाबतची माहिती अद्याप दिलेली नाही.
- हे अॅप अँड्रॉइड प्रणालीसह संगणकावरून वापरणार्यांना केव्हा उपलब्ध होईल याबाबतही एनपीईतर्फे कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
- इच्छुक युजर्स https://npe.fb.com/collab या लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करू शकतात.
- तर यासाठी https://www.facebook.com/groups/collab.beta हा फेसबुक ग्रुप देखील तयार करण्यात आला असून याला जॉईन होऊ शकतात.
Post a Comment