विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर


MK Digital Line
निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलासा देत विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक घेणार असल्याचं जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरेंवरील संकट टळलं आहे. विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली होती. 

त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीनंतर निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला असून 21 मे रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post