दिल्लीत सीआरपीएफ 'एवढ्या' जवानांना कोरोना!


MK Digital Line
दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीफ) आणखी 12 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून दिल्लीत कोरोनाची लागण झालेल्या सीआरपीएफ जवानांची संख्या आता 122 झाली आहे. आणखी 150 जवानांच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी असून ही संख्या आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

कोरोनाची लागण झालेले हे सर्व जवान एकाच बटालियनचे आहेत. ही बटालियन राजधानी दिल्लीच्या मयूर विहार फेझ-3 येथे तैनात आहे.

सीआरपीएफच्या 31 बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक मोहम्मद इकराम हुसेन याचा कोरोनामुळे 28 एप्रिलला मृत्यू झाला होता. त्यांनी सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोना आता अर्धसैनिक दलापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. दरम्यान, देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post