21 मे नंतर राज्यातील कोरोना आटोक्यात येणार
MK Digital Line
महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या राज्यांत 21 मे नंतर कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळणार नाही. तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्यांत 10 मे पर्यंत प्रादुर्भाव राहणार आहे.
आंध्र प्रदेश, दिल्ली, हरयाणा, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, राजस्थान, तेलंगणा या राज्यात 7 मेपर्यंत कोरोना प्रादुर्भाव दिसून येईल, असे भाकीत मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाने केला आहे. विभागाने देशभरातील विविध राज्यांतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या अभ्यास करून अहवाल तयार केला आहे.
देशासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाने डॉ. नीरज हातेकर यांच्या नेतृत्वाखाली कोरोना बाबत एक अहवाल तयार केला आहे. या अहवालातील अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रात 55 टक्क्यांहून अधिक संक्रमण मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर येथे होत आहे.
Post a Comment