कोरोना रोखण्यासाठी 'हे' वापरले जाऊ शकते!


MK Digital Line
सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील कोरोनाचा धोका टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कॉमन मोबिलिटी कार्ड सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. दिल्ली, अहमदाबाद आणि बंगळुरू या मेट्रो शहरांमध्ये ही सेवा पहिल्यापासूनच आहे. 

या कार्डचा उपयोग मेट्रो, बस, रेल्वे, टोल, पार्किंग, स्मार्ट सिटी आणि किरकोळ दुकानांवर देखील करता येईल.

● फायदेशीर व सुरक्षित सेवा :

या कार्डद्वारे तिकीट काउंटरवरील गर्दी, कंडक्टरशी व्यवहार, टोल किंवा पार्किंग शुल्क या गोष्टींपासून सुटका झाल्याने, संसर्गचा धोकाही कमी होईल. केंद्र सरकारच्या वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्यानुसार सार्वजनिक परिवहनाच्या बाबतीत कॉमन मोबिलिटी कार्ड आज सर्वात फायदेशीर व सुरक्षित सेवा ठरू शकते. 

● अनेक शहरांमध्ये या कार्डचा वापर :

कोरोनाच्या संक्रमणाचा धोका सर्वाधिक प्रमाणात बस स्टँड, रेल्वे स्टेशन, टोल आणि पार्किंग इत्यादी गर्दीच्या ठिकाणीच असणार आहे. सार्वजनिक वाहतुकीत संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे, त्यामुळे प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्यावी लागेल. जगभरात सिंगापूर, न्यूयॉर्क, पॅरिस, सिडनी, पर्थ, लंडन आणि मेलबर्न सारख्या अनेक शहरांमध्ये या कार्डचा वापर केला जातो.

कॉमन मोबिलिटी कार्ड सेवा सुरू करण्याबाबत केंद्राने सर्व राज्यांशी चर्चा केली असून, बहुतेक राज्य यासाठी पॉझिटिव्ह आहेत. हे कार्ड डेबिट-क्रेडिट कार्ड सारखेच असेल. ते पुर्णपणे कॉन्टॅक्ट लेस कार्ड असेल. म्हणजेच यावर कोणतीही वैयक्तिक माहिती नसेल.

या कार्डच्या मदतीने बस, मेट्रो आणि दुसऱ्या सार्वजनिक वाहनांचे भाडे देण्यासह खरेदीही करता येईल. या कार्डद्वारे पैसे देखील काढता येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post