कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल


MK Digital Line
ऑस्ट्रेलियाने भारताला जबरदस्त धक्का देत आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळवत भारताला तिसऱ्या क्रमांकावर फेकले आहे.

या यादीत भारताव्यतिरिक्त ऑक्टोबर 2016 नंतर पहिल्यांदाच इतर संघाने अव्वल क्रमांक मिळवला आहे. ही नवी क्रमवारी शुक्रवारी आयसीसीने घोषित केली.

असे असले तरी आयसीसीच्याच जागतिक कसोटी चॅम्पिअनशिप गुणतालिकेमध्ये भारतीय संघ हा अव्वल स्थानावर आहे. या चॅम्पिअनशिपमध्ये 9 संघ सामील असून यातील सगळे संघ 6 कसोटी सामने खेळतील. गुणतालिकेच्या आधारावर पहिल्या 2 संघांमध्ये अंतिम कसोटी सामना लॉर्डसवर होईल.

Post a Comment

Previous Post Next Post