पाकिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं


MK Digital Line
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान कराची विमानतळाजवळील निवासी भागात कोसळले आहे. 

या विमानात 90 प्रवासी असल्याची माहिती आहे, लाहोरहून कराचीकडे हे विमान येत होते. या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, जीवितहानीबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

विमानाचा अपघात निवासी भागात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले.

Post a Comment

Previous Post Next Post