राज्यात कोरोनाचे 1278 नवीन रुग्ण


MK Digital Line
राज्यात रविवारी 1278 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 22 हजार 173 झाली असून आतापर्यंत 53 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे, 4 हजार 199 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

आतापर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात रविवारी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे गडचिरोली वगळता आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर, मागच्या तीस दिवसांत गोंदियात एकही नवा रूग्ण आढळलेला नाही. 

भंडारा आणि गोंदियातील एकमेव रूग्णांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने सध्या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. तर, वाशिम आणि बीडमध्येही आतापर्यंत एक एकच कोरोना बाधिताची नोंद आहे.

Post a Comment

Previous Post Next Post